मुंबई

आज मुंबईसह ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सलग तीन दिवस सुरु असलेल्या पावसाने सोमवारी थोडीफार विश्रांती घेतली. काल अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. तर आज मुंबईसह ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गमधील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने  वर्तवला आहे. 

शुक्रवारपासून सलग तीन दिवस मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. सोमावारी अधून मधून जोरदार सरी कोसळत होत्या. काल सर्वाधिक पाऊस आज पश्चिम उपनगरात नोंदविण्यात आला. सोमवारी रात्री 8 वाजे पर्यंत 24 तासात बोरीवलीत 75.7 मिमी, कांदिवलीत 64.23 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसाने मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

आज मुंबई, ठाणे पालघर या तीन जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा म्हणजे 24 तासात 65 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

1 ते 6 जुलैपर्यंत मागील वर्षापेक्षा जास्त सरसरी पावसाची नोंद 

मुंबई शहर आणि उपनगरात गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला. 1 ते 6 जुलै या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत सरसरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुंबई शहरात मागील वर्षी 1 ते 6 जुलैपर्यंत 735.1 मिमी पाऊस झाला तर यावेळी 928.3 मिमी नोंद झाली. तर मुंबई उपनगरात 2019 मध्ये 705 मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यावेळी 896.2 मिमी पावसाची नोंद झाली.

कुलाबा येथे 3 जुलैला 169 मिमी, 4 जुलैला 129. 6 मिमी, 5 जुलैला 12.4 मिमी तर सांताक्रुझ येथे 3 जुलै 157 मिमी, 4 जुलै 200 मिमी, 5 जुलै 116.1 मिमी पावासाची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

rain updates light to medium rainfall expected in mumbai thane and palghar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT