मुंबई

Mumbai Air Quality : ...म्हणून मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; महत्त्वाच्या भागातील AQI जाणून घ्या

संतोष कानडे

मुंबईः मागच्या महिन्याभरापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. परंतु कालपासून हवेचा AQI सुधारल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण आहे पाऊस. मागच्या तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी मुंबईतदेखील पाऊस कोसळला.

रविवारी नाशिक, मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या निफाडमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. नगरमध्येही पाऊस कोसळला. केवळ पाऊसच नाही तर गारपीटदेखील झाल्याचं बघायला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता मात्र सुधारली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली गेलाय तर बीकेसीचा AQI 103 इतका आहे. पुढील तीन ते चार दिवस हवेची गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. सोमवारीही मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

कोणत्या भागात हवा सुधारली

  • कुलाबा - 76

  • भांडुप - 37

  • मालाड - 35

  • माझगाव - 47

  • वरळी - 33

  • बोरिवली - 65

  • बीकेसी - 103

  • चेंबूर - 89

  • अंधेरी - 67

  • एकूण मुंबई - 60 AQI

  • नवी मुंबई - 53

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

  • शून्य ते ५० एक्यूआय - उत्तम

  • ५० ते १०० एक्यूआय - समाधानकारक

  • १०१ ते २०० एक्यूआय - मध्यम

  • २०१ ते ३०० एक्यूआय - खराब

  • ३०१ ते ४०० एक्यूआय - अतिशय खराब

  • ४०१ ते ५०० एक्यूआय - गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय नागरिकत्वाशिवाय मतदार यादीत नाव, सोनिया गांधींसह दिल्ली पोलिसांना कोर्टाची नोटीस

प्रथमेश परबचा 'डिलिव्हरी बॉय' घराघरात पोहोचणार; वर्षअखेरीस अल्ट्रा झकासवर मराठी चित्रपटांची 'डबल धमाल'!

Latest Marathi News Live Update : पुण्यात ५० वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला

Nagpur Accident: नागपूर अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Pune Municipal Election : इच्छुकांनी घेतले तीन हजार उमेदवारी अर्ज; १६५ जागांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT