Mumbai Local Esakal
मुंबई

Mumbai Local: मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला असून रेल्वे वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मुंबईत, ठाणे, कल्याण परिसरात काल (मंगळवारी) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. (Latest Marathi News)

पावसामुळे मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं असून पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक देखील बंद आहे. पावसाचे पाणी रुळावर आल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.(Latest Marathi News)

पावसामुळे मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.(Latest Marathi News)

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. कर्जत अंबरनाथ आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल बंद ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT