raj kundra and shilpa shetty sakal
मुंबई

Mumbai News : राज व शिल्पाच्या मालमत्तेवर टाच

बिटकॉइन कंपनीच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित ‘ईडी’ने केली कारवाई.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आर्थिक फसवणूकप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी उद्योगपती राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्याशी संबंधित ९७ कोटी ७९ लाखांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यात शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेली मुंबईच्या जुहू परिसरातील सदनिका आणि पुण्यातील बंगल्याचा समावेश आहे.

एका बिटकॉइन कंपनीच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. एका बिटकॉइन कंपनीच्या नावाने संकेतस्थळ बनवून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाली होती. पुणे पोलिसांनी कोट्यवधीच्या बिटकॉईन गैरव्यवहारप्रकरणी अमित आणि विवेक भारद्वाज बंधूंना अटक केली होती. त्यांच्यावर आठ हजार गुंतवणूकदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप होता.

त्यानंतर ‘ईडी’ने याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या प्रकरणाशी राज कुंद्रांचे संबंध असल्याचे धागेदोरे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी कुंद्रा यांची चौकशीही करण्यात आली होती. २०२१ मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणात कुंद्रा यांना अटक झाली होती. काही महिन्यांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT