मुंबई: पॉर्न चित्रपट (Porn Content) आणि वेब सिरीज (Adult Web Series) बनवल्याप्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. त्या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट्स आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून धक्कादायक माहिती उघड केली जात आहे. या तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणूकीची अनेक प्रकरणे पोलिस तपासात दिसून येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.
केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार शेलार यांनी म्हटले आहे, "राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहेत असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केले गेले होते. अशा 40हून अधिक बेकायदेशीर अश्लील अँप्स आणि वेबसाइट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोरवयीन मुलांवर विपरीत परिणाम होत असून हे नकारात्मकतेने घेरले आहे. चाइल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आहेत आणि 213 एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45% वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे."
"मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. Alt Balaji, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov ही त्यातील काही आघाडीची नावे घेतली जात आहेत. म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्क फोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अँप्स आणि वेबसाइट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशा सर्व अँप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत", अशी मागणी शेलार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.