raj kundra shilpa shetty
raj kundra shilpa shetty file image
मुंबई

पॉर्न वेबसाइट्सवर 'हॉटशॉट'च्या जाहिरातसाठी राज कुंद्राने मोजले लाखो रुपये

दीनानाथ परब

मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राने (Raj Kundra) आघाडीच्या पॉर्न वेबसाइटसवर हॉट शॉट अ‍ॅपच्या (Hot shot app) जाहीरातीवर लाखो रुपये खर्च केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हेशाखेने (crime branch) केला आहे. कुंद्राच्या फोनमधील ईमेल मधून ही माहिती पोलिसांना मिळाली. (Raj Kundra spent lakhs on advertising HotShots app Mumbai Crime Branch dmp82)

उपलब्ध कंटेट पोर्नोग्राफी नसून ते कामुक साहित्य आहे तसेच आपल्याला अ‍ॅपचे काम कसे चालते, त्या बद्दल माहित नाही, असा दावा राज कुंद्राने केला होता. पण ई-मेल मधून समोर आलेल्या माहितीमधुन राज कुंद्राचा खोटेपणा उघडा पडतोय, असे गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले. राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुंद्राच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात ई-मेल्स मिळाले असून त्यातून तो भारतातूनच अ‍ॅप चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज कुंद्रा कंपन्यांना ई-मेल पाठवायचा. त्या कंपन्या पॉर्न वेबसाइटवर जाहीरातीसाठी मदत करायच्या. आघाडीच्या पॉर्न वेबसाइटसवर या जाहीराती प्रसिद्ध व्हायच्या, असे गुन्हे शाखेने सांगितले.

हॉट शॉट अ‍ॅपची जाहिरात आघाडीच्या पॉर्न वेबसाइट्सवर करण्यासाठी राज कुंद्रा लाखो रुपये मोजत असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले."पोलिसांना आठ ते १० लाखाची बिलं आढळून आली आहेत. हॉट शॉट अ‍ॅपच्या जाहीरातीसाठी प्रत्येक वेबसाईटवर एक ते दीड लाख रुपये खर्च करत असल्याचे प्राथमिक विश्लेषणातून समोर आले आहे" असे अधिकाऱ्याने सांगितले. याच आधारावर पोलिसांनी आणखी सात दिवसांची कोठडी वाढवून मागितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT