Rajnikanth-Raj-Thackeray 
मुंबई

रजनीकांत यांच्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, "ज्या अभिनेत्याचं देऊळ..."

विराज भागवत

मुंबई: 'थलायवा' अभिनेते रजनीकांत यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. त्यासाठीच त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. रजनीकांत यांना पुरस्कार झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सर्वच स्तरांतून त्यांना सदिच्छा दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचे विशेष शब्दात अभिनंदन केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टवरून रजनीकांत यांचे अभिनंदन केले. "रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेलापण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतातदेखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन", अशा खास शैलीत राज ठाकरे यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या.

रजनीकांत यांच्याबद्दल थोडंसं...

रजनीकांत यांचा जन्म बंगळुरूमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांनी 'बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन'मध्ये कंडक्टर म्हणून काम केलं होतं. रजनीकांत यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली भाषांतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटसृष्टीत ते त्यांच्या स्टाईलसाठी विशेष ओळखले जातात. कंडक्टर असतानाही तिकिट देण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे ते लोकप्रिय होते. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये काम केलं. यासाठी त्यांनी कंडक्टरची नोकरी सोडली.

एका नाटकादरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालाचंद्र यांनी रजनीकांत यांना पाहिलं आणि त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. १९७५ मध्ये रजनीकांत यांनी 'अपूर्व रागंगल' या तामिळ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात त्यांनी केवळ १५ मिनिटांची भूमिका साकारली होती. रजनीकांत यांचे केवळ देशभरात नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. रुपेरी पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्यांचा अॅटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे.  आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रजनीकांत हे पडद्यावर अतिशय स्टायलिश असतात, पण खऱ्या आयुष्यात ते अतिशय साधे वावरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT