मुंबई

"संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी"

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मिमिक्रीवर (Mimicry) आमचे राजकारण अवलंबून नाही, ईडी (enforcement directorate) समोर आम्ही गप्प बसत नाही अशी टीका शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राज ठाकरे (raj Thackeray) यांच्यावर केली होती. याला प्रत्युत्तर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "त्यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी" असा सल्ला राऊत यांना देऊ केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांचे दिवा विभागीय कार्यालयाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन सरदेसाई, अभिजित पानसे, अविनाश जाधव, तुषार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी पुण्यातील सभेत संजय राऊत यांची मिमिक्री केली होती.

त्यावर संजय राऊत यांनी " आमचे राजकारण मिमिक्रीवर अवलंबून नाही, ईडी समोर आम्ही गप्प बसत नाही" असे म्हटले होते. त्यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना राऊत यांना वरील सल्ला देऊ केला. दरम्यान ठाणे महापालिका निवडणूक सभेनंतर मनसे अध्यक्ष राज हे दुसऱ्यांदा दिवा मध्ये आले होते. दिवेकरांशी ते संवाद साधतील अशी अपेक्षा असतानाच राज यांनी दिवेकरांना केवळ हात दाखवून शुभेच्छा देत ते निघून गेले.

बॅनरची चर्चा

मनसे दिवा विभागीय कार्यालयाच्या उडघटनासाठी राज ठाकरे दिव्यात येणार असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी लागलेले बॅनर वर 'महाराष्ट्राभिमानी एक, शिवछत्रपतींचा लेक' असा उल्लेख केला होता. एरव्ही मराठी हृदयसम्राट अशा उल्लेखाचे बॅनर लावले जात असताना या वेगळ्या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT