Uddhav Thackeray MNS Raj Thackeray 
मुंबई

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; म्हणाले, हा माणूस...

आधीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यावर राज ठाकरे यांनी सडतोड भाष्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, असं राज यांनी उद्धव यांना उद्देशून म्हटलं आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीशी मुलाखतीदरम्यान त्यांनी हे भाष्य केलं. (Raj Thackeray criticizes Uddhav Thackeray Said this man is not to be trusted)

भाजपशी मनसेची युती होईल किंवा होणार नाही. पण यापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंना किंवा त्यांनी तुम्हाला कधी टाळी देण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं त्याचं विश्वास ठेवण्यासारखं नाहीए काही. इतर लोकांचं मला वाईट वाटतं पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही"

आत्ताच्या शिवसेनेत मराठीच्या बाबतीत काहीच नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबतच त्या सर्व गोष्टी गेल्या. रझा अकादमीनं जेव्हा मुंबईत धुडगुस काढला होता. पाकिस्तानी कलाकारांना आम्ही हाकलून दिलं होतं. आत्ता भोंग्यांचा विषयही आम्हीच बंद केला. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मी चालवतोय असं मला वाटतं, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT