Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis 
मुंबई

राज ठाकरेंनी रात्री-अपरात्री मदतीसाठी कधीही हाक द्यावी; CM शिंदेंचं आवाहन

मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरेंनी मदतीसाठी रात्री-अपरात्री कधीही आमच्याकडं यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाजी पार्कवर दरवर्षी मनसेच्यावतीनं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं, या दीपोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde together on a stage of MNS Dipotsav)

या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याचं पहायला मिळालं. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणतील नव्या समिकरणाची ही नांदी असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या दीपोत्सवाचं कौतुक करताना राज ठाकरेंना आवाहनही केलं. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये हा दीपोत्सवाचा कार्यक्रम होत आहे. पण मनात इच्छा असतानाही आम्हाला इथं येता आलं नाही, योगायोग लागतो त्याला. चांगली सुरुवात आहे ही. तुम्ही आम्हाला मध्ये पत्रही दिलं, तुम्ही भेटलातही. त्यामुळं आम्ही दोघांनीही ठरवलंय की, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला सांगितलं की कधीही हक्कानं सांगा. दोघेही आम्ही अगदी उशीरापर्यंत काम करत असतो. त्यामुळं राज ठाकरे कधीही येऊ शकतात. रात्री, अपरात्री अगदी मध्यरात्री देखील, आम्ही त्यांना भेटणार. यामध्ये मी टीका करत नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT