raj thackeray future CM of maharashtra poster displayed before mns gudi padwa melava shivaji park mumbai  
मुंबई

Raj Thackeray Poster : 'भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे'; सभेआधी मनसेची पोस्टरबाजी

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मोठ्या उत्साहात मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याचा सण आज (दि.२२) साजरा केला जात आहे. आजच मनेसाचा गुढी पाडवा मेळावा देखील होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या भाषणाबद्दलची उत्सुकचा शिगेला पोहचली असतानाच मनसेकडून सेनाभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

गुढीपाडवा मेळावा निमित्त मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. "महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे" या आशयाचे बॅनर सेनाभवना समोर लावण्यात आले आहेत. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

राज ठाकरे काय बोलणार...

मुंबईत आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर देखील मनसेकडून (MNS) जारी करण्यात आला होता.

टीझरमध्ये काय आहे?

या टीझरमध्ये गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये आवाहन करण्यात आलंय की, "महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी... चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई"

४० सेकंदाच्या या टिझरमध्ये सुरुवातीला विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडितील शब्द अक्षऱात दिसतात, त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का...महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT