Raj Thackeray Sabha
Raj Thackeray Sabha ESAKAL
मुंबई

Raj Thackeray Sabha: "ते म्हणाले आमच्या चिन्हावर लढा पण..."; राज ठाकरेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Sandip Kapde

Raj Thackeray Sabha: गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पारंपरिक सभेला संबोधित केले. दादरच्या शिवाजी पार्कवर ही सभा पार पडली आहे.   तब्बल ५ वर्षानंतर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकेच्या निवडणुका रखडल्या... २०१९ नंतर थेट २०२४ ला जनमत उमगेल, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला निवडणूक आयोगावर टीका केली.

निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे. हे चुकीचं आहे. आरोग्य सेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी. तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

अमित शहा यांच्या भेटीवर राज ठाकरे काय म्हणाले?

अमित शहा यांच्या भेटीदरम्यान फक्त मी आणि ते होतो. भेट दुसऱ्या दिवशी होती मी आधल्या दिवशी गेलो होते. त्यानंतर मी बोललो नाही. कारण माझ्याकडे बोलायला काही नव्हतं. अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार?, अशा चर्चा रंगल्या. मला व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. पण मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नव्हती, स्वत:चा पक्ष काढीन पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही ही खूनगाठ मी बांधली होती, असे राज ठाकरे म्हणाले.

माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे. जागावाचपावर चर्चा झाली. मी शेवटचा जागावाटपाच्या चर्चेवर १९९५ ला बसलो होतो. तेव्हापासून मी बसलो नाही. मला सांगितलं आमच्या निशाणीवर लढा. चिन्हावर तडजोड होणार नाही.

राज ठाकरे म्हणाले, म्हणे ठाकरे कधी दिल्लीत गेले नाहीत. काहीजणांना राजकीय इतिहासाचं माहित नसतो. बाळासाहेब १९८० साली दिल्लीत संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. नेत्यांना भेटणं, चर्चा करणं... ह्यात वावगं काय? मी अमित शहांना भेटल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. २०१४ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, २०१९ ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात. 

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार?

काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार...अरे मूर्खांनो व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही. तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार... मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे म्हणातात आपण एकत्र काही केलं पाहीजे हे दिडवर्षापासून सांगत होते. पण म्हणजे काय हे सांगत नव्हते. यासाठी मी अमित शहा यांना भेटलो. पण निशाणीवर प्रकरण आलं. माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार... ! कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT