मुंबई

Video: "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक

राज ठाकरेंनी शिक्षिका सुमन रणदिवेंशी फोनवरून साधला संवाद

संदीप पंडित

राज ठाकरेंनी शिक्षिका सुमन रणदिवेंशी फोनवरून साधला संवाद

विरार (मुंबई): राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिकविणाऱ्या आणि घडविणाऱ्या शिक्षिका सुमन लक्ष्मण रणदिवे (Teacher Suman Randive) यांना तौक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसला होता. या वादळामुळे त्या राहत असलेल्या वृद्धाश्रमाची (old age home) दुरवस्था झाली. वसई (Vasai) परिसरातील सत्पाळा गावातील न्यू लाईफ केअर त्या वृद्धाश्रमात गेल्या एक वर्षापासून राहत आहेत. सोमवारी आलेल्या वादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे (Shades) उडाले. खूप नुकसानी झाली. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी फोनवरून संवाद (Phone Conversation) साधला. यावेळी राज यांनी त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, लॉकडाउन (Lockdown) संपल्यानंतर एक स्वत: त्यांना भेटायला येण्याचेही वचन दिले. (Raj Thackeray had emotional phone conversation with Vasai Teacher Suman Randive promises to meet her see video)

पाहा व्हिडीओ-

मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने वृद्धाश्रमा जाऊन तेथून राज यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा थेट सुमन रणदिवे यांच्याशी संवाद घडवून आणला. सुमन रणदिवे यांनी राज ठाकरेंशी बोलताना काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, आपल्या वृद्धाश्रमावर ओढवलेल्या संकटाचीही माहिती दिली. संवादाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी राज यांना एकदा समक्ष भेटायला येण्यास सांगितलं. त्यावर राज ठाकरे यांनी तेथे जाऊन सुमनताईंची भेट घेण्याचे वचन त्यांना फोनवरून दिले. तसेच, मनसे पदाधिकाऱ्यांना त्या वृद्धाश्रमासाठी आवश्यक सर्व मदत करण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

Shocking News : पोपटाच्या मृत्यूने दु:खात बुडाला मालक, मृत पक्षी घेऊन थेट कलेक्टरकडे पोहोचला अन् केली 'ही' मागणी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

Sangli Election : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या ‘पायावर डोके’; सांगलीत निवडणूक प्रचाराला भावनिक वळण

Pune Municipal Election : पुण्यात भाजपचा पहिला नगरसेवक; मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT