Amruta Fadnavis_Raj Thackeray_Devendra Fadnavis 
मुंबई

Raj Thackeray: उपमुख्यमंत्री कोणासोबत आहेत तेच कळत नाही! अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा टोला

अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणासोबत आहेत तेच कळत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. याबाबतचा प्रश्न अमृता फडणवीस यांनी त्यांना विचारला होता. यावर राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. (Raj Thackeray interview taken by Amol Kolhe Amruta Fadnavis)

आजकाल राजकारणात खूप टाळी देणं आणि डोळे मारणं सुरु आहे? यावर तुमचं म्हणणं काय आहे? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ज्या त्या वयात त्यांच्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील म्हणून काही राजकारणी ते करत असतील.

कधी तुम्ही राष्ट्रवादीच्या जवळ दिसता तर कधी तुम्ही शिंदे गटाच्या जवळ दिसता तर कधी भाजपला टाळी देता, पण आता तुम्ही कोणासोबत आहात? यावर राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही. कारण ते पहाटे गाडी घेऊन कुठेतरी जातात, तुम्हाला त्याचा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंसोबत असतात कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. त्यामुळं कोणाला बोलणं-भेटणं ही पत्रकारांसाठी बातमी झाली आहे.

त्यामुळं राजकारणातला जो काही मोकळेपणा होता तो आता मीडियानं घालवला आहे. त्यामुळं कोणी कोणाशी बोललं, कोणी कोणाशी भेटलं तर युती किंवा आघाड्या होत नसतात. त्याला मुर्त स्वरुप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT