मुंबई

राज आले उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून! पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

विराज भागवत

मुंबई: कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असताना लसतुटवडा निर्माण झाला. तशातच दररोज राज्यात ५० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागणार की नाही? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात होता. त्याबद्दलचे उत्तर काल स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. काही सेवा निर्बंधासह सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी लॉकडाउनसदृश निर्बंध आणि संचारबंदी पुढील १५ दिवसांसाठी लावण्यात आली आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्याकडे काही मागण्यांचा पाठपुरावा करत होते. याच कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

राज्यातील कोरोनास्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत १०० टक्के लसीकरण गरजेचे आहेत. सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर मी पुढील मागण्या करत आहे असं त्यांनी पत्रात नमूद केलं. त्या मागण्या पुढीलप्रमाणे-

१. महाराष्ट्र राज्याला स्वातंत्र्य पणे लस खरेदी करू द्या

२. राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात

३. 'सीरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी

४. लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी

५. कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यत पावलं उचलण्याची मोकळीक द्यावी.

याशिवाय, प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती जशी वेगळी आहे तशीच वैद्यकीय स्थितीदेखील वेगळी आहे. त्यामुळे आपापल्या राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांना स्वत:च्या राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. कोरोना स्थिती नियंत्रणासाठी स्थानिक पतिस्थितीनुसार धोरण आखण्याची राज्यांना परवानगी द्यावी. जेणेकरून त्यातून  विविध उपाययोजना पुढे येतील. त्याचा इतर राज्यांना आणि पर्यायाने देशालाही फायदा होईल, अशीही मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT