raj-Thakare
raj-Thakare sakal
मुंबई

ठाण्यात ९ एप्रिलला राज ठाकरेंची सभा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशा संदर्भात गुढीपाडव्याच्या दिवशी वक्तव्य केले होते. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यात येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. असे असेल तरी देखील मनसेने ज्या मुस रोडवर सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्याठिकाणा ऐवजी इतर ठिकाणांचा पर्याय पोलिसांनी त्यांच्यापुढे ठेवला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत हिंदूत्वाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत विधान केल्यानंतर गृहनिर्माण मंत्नी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टिका केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ एप्रिलच्या नियोजित सभेच्या आयोजनाकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अशातच गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. मात्र, याच दिवशी हिंदीभाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्नी एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. शिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील हायलॅन्ड मैदान व काशिनाथ घाणोकर नाटय़गृह हे दोन पर्याय सुचविले आहेत.

गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचिठकाणी सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आम्ही त्याच ठिकाणी सभा घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT