Raju-Patil-MNS 
मुंबई

Coronavirus: मनसेचे एकमेव आमदार कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रूग्णवाढ होत आहे. तशातच कल्याण-डोंबिवलीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच एकमेव आमदार राजू पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. "गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन", असे ट्वीट त्यांनी केले.

दरम्यान, आज दिवसाभरात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ९८७ नवे कोरोनाबाधित आढळून आले.

याशिवाय, उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ६ हजार ६७१, कोरोनातून बरे झालेल्यंची संख्या ६५ हजार ९३१ आहे. याशिवाय आज डिस्चार्ज झालेल्यांची संख्या २४१ असून, चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे काय नवीनच! दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीसोबत लग्न; एक राहातो गावात तर दुसरा परदेशात

Latest Marathi News Updates : ७२ तासांनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

Talegaon Dhamdhere News : तळेगाव ढमढेरे येथे कडकडीत बंद, मोर्चा व प्रशासनाचा निषेध

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक! नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून

Video : अंतराळातून उडी मारून रेकॉर्ड बनवला; पण वरून स्विमिंगमध्ये पडून जागीच शरीराचा चेंदा मेंदा, धक्कादायक व्हिडिओ..

SCROLL FOR NEXT