raj thackeray
raj thackeray esakal
मुंबई

Raj Thackeray: छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आठवला, राज ठाकरेंनी सांगितला मुलाखतीचा किस्सा

शर्मिला वाळुंज

Dombivli News: आपल्याकडील महापुरुष हे आपण जातीत विभागून टाकले आहेत. या महापुरुषांवरच राजकारण सध्या आता सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आता रायगड आठवला का ? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा कल्याण लोकसभेचा दौरा पार पडला. शनिवारी डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्या गटाला तुतारी वाजविणारा माणूस असे चिन्ह मिळाले आहे. रायगडावर या चिन्हाचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

याविषयी पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पवार यांना आता रायगड आठवला का असा सवाल उपस्थित केला.

आपल्याकडचे महापुरुष हे आपण जातीत विभागून टाकले आहेत. या महापुरुषांवरच राजकारण सध्या आता सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. ठाण्यात जाहीर सभेत मी सांगितलं होतं, त्यांची मुलाखत मी घेतली होती.

तेव्हाही त्यांना प्रश्न विचारला होता, की तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर सर्व बोलता पण छत्रपतींचे नाव कधी घेत नाहीत. शिवछत्रपतींचे नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मत जातात अशा काहीतरी संभ्रमावस्येमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढले आणि आता त्यांना फुंकू दे असा टोला राज यांनी लगावला.

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा आज केवळ चाचपणी करतोय. आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुंबईत बैठका झाल्या. तर शाखाध्यक्षपर्यंतच्या बैठका आम्ही आता सुरू केल्या असून मुंबई आणि ठाणे अशा बैठका झाल्या आहेत. ठाणे,कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठका होणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिकाही आपण लवकरच स्पष्ट होईल असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच भूमिका स्पष्ट होईल...

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काही दिवसच शिल्लक असून मनसेची लोकसभेबाबतची भूमिकाही लवकरच स्पष्ट होईल असे सांगत लोकसभेबाबतचा सस्पेन्स राज ठाकरे यांनी कायम ठेवला. तर एखादा माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करण्यासारखी टोकाची भूमिका घेतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतही राज ठाकरे यांनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर मांडले.

आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक...

एखादा आमदार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जेव्हा गोळीबार करतो त्यावेळी त्या आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक आहे पोलिसांनी त्यानुसारच सखोल चौकशी केली पाहिजे असे राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

ईव्हीएमवर बोलताना ते म्हणाले, इतरत्र सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का नाही चालत. सामान्य जनता कोणाला मत देते हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. मध्यंतरी काही ईव्हीएम वर स्लीप देण्यात येणार होती असे बोलले जात होते. मात्र तेही सगळीकडे लागू पडलेले नाही. त्यामुळे ईव्हीएम चा घोळ आहे हे मी कायमच बोलत होतो. मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो त्यानंतर बोलतो असे त्यांनी सांगितले.

पक्ष विरुद्ध पक्ष चिन्ह विरुद्ध चिन्ह अशा पद्धतीने राजकारण लढणे हे महाराष्ट्रातील चांगले चिन्ह नाही. हे सगळे सुधारायचे असेल तर जनतेने भानावर येणे आवश्यक आहे. या सर्व लोकांना जनतेनेच वठणीवर आणले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे हे ठीक पण त्यासाठी राज्याच्या पातळीवर काय राजकारण खेळले जाते. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन लोक राजकारणात येत आहेत. मात्र अशा पद्धतीने राजकारण खेळत असल्याने त्यांना हेच राजकारण खरे असल्याचे वाटते. याआधी कधीही महाराष्ट्रात अशी अस्थिर परिस्थिती मी अनुभवली नाही.

बेरोजगार पाणी प्रश्न या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे राजकारण केले जात आहे. काही गोष्टींना थांबवण्यासाठी त्या त्या राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे हे पक्ष अधिक मजबूत वाघ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

शाळेतल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय ? ही यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात तर मग हे काम कसे करतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT