Raj Thackeray: साहेब मराठी शाळा वाचवा... शालेय विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्षांना साद

Raj Thackeray: साहेब मराठी शाळा वाचवा... शालेय विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्षांना साद

Kalyan News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी राज यांना मराठी शाळा वाचवा अशी साद घातल्याचे दिसून आले. राज यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटवून त्यास प्रतिसाद दिला.

Raj Thackeray: साहेब मराठी शाळा वाचवा... शालेय विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्षांना साद
Raj Thackeray: कल्याण लोकसभेसाठी मनसे इच्छुक? आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत..!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण ते डोंबिवली अशी बाईक रॅली काढत राज यांचे मनसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. डोंबिवलीत आगमन होताच राज यांनी सर्वप्रथम डोंबिवलीचे आराध्य दैवत श्री गणेशाचे दर्शन गणपती मंदिरात जाऊन घेतले.

यानंतर त्यांनी फडके रोडवरील मनसेच्या मध्यवर्ती शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजू पाटील, अविनाश जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवलीत जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, मनोज घरत, संदीप म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, प्रतीक देशपांडे यांसह अनेक पद्धधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Raj Thackeray: साहेब मराठी शाळा वाचवा... शालेय विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्षांना साद
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या स्वागतासाठी डोंबिवली सजली; भल्या मोठ्या कटाऊटनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

मराठी भाषा दिनानिमित्त मध्यवर्ती शाखेवर पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेकडून कल्याण ग्रामीण भागातील सुमारे 38 शाळांत पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. याचे प्रातिनिधिक स्वरूपात आज 5 शाळांना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. राज यांनी पुस्तक दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना साहेब मराठी शाळा वाचवा अशी साद घातली

Raj Thackeray: साहेब मराठी शाळा वाचवा... शालेय विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्षांना साद
Raj Thackeray On Maratha Reservation Bill: मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यात आली; राज ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com