Raj Thackeray
Raj Thackeray sakal
मुंबई

Raj Thackeray: मनसे मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादर परिसरात वाहतुकीत बदल!

सकाळ वृत्तसेवा

MNS Gudipadva Rally: येत्या ९ एप्रिलला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे. यामुळे पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावर तसेच शिवाजी पार्कवर जाण्याच्या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यत वाहतुकीत बदल केले आहे अशी माहिती पोलीस उप आयुक्त-वाहतूक (मुख्यालय मुख्यालय व मध्य विभाग) समाधान पवार यांनी दिली.

वाहने उभी करण्यास मनाई

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (श्री. सिद्धीविनायक मंदीर जंक्शन ते यस बैंक जंक्शन),केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), एम. बी. राऊत मार्ग. पांडुरंग नाईक मार्ग, (रोड नं. ५),दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड) एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक) या रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.

पाडवा मेळावा दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

पाडवा मेळावा दरम्यान वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन करण्यात येणारे मार्ग आणि आवश्यकता भासल्यास त्यांचे पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलिसांनी ठरवून दिले आहेत. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (श्री. सिद्धीविनायक मंदीर जंक्शन ते यस बैंक जंक्शन) मार्गाला पर्यायी मार्ग सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड या रस्त्याचा वापर करायचा आहे.

राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शन मार्गावरील वाहनांनी एल. जे. रोड, गोखले रोड, स्टिलमॅन जंक्शन उजवे वळण घेवून स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करायचा आहे. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहीनी वरील वाहनांनी राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा. तसेच गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर मार्गावरील वाहनांनी एम. बी. राऊत मार्गाचा वापर करायचा आहे.

MNSवाहन पार्किग व्यवस्था

पश्चिम आणि उत्तर उपनगरे : पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माटुंगा रेल्वे स्थानक येथे आलेनंतर माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज यादरम्यान मेळाव्यास येणारे नागरिकांना उतरुन वाहने रेती बंदर, माहिम, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, कामगार मैदान, सेनापती बापट मार्गावर तसेच हलकी वाहने कोहिनुर पीपीएल पार्किंग मध्ये पार्क करु शकतात.

पुर्व उपनगरे :- ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरुन वाहने पाच गार्डन-माटुंगा आणि आरएके ४ रस्ता येथे पार्क करावी.(Vehicles coming from Eastern Expressway from Thane, Navi Mumbai to Dadar T. T. Alight at circle and park vehicles at Pacha Garden-Matunga and RAK 4 road.)

शहरे व दक्षिण मुंबई :- वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाटय मंदिर येथे उतरुन वाहने इंडिया बुल्स फायनान्स पीपीएल पार्किंग, आप्पासाहेब मराठे मार्ग. तसेच बी. ए. रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. टी सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गार्डन माटुंगा किंवा आर. ए.के. ४ रोड या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील.

-----------

मेळाव्यासाठी पार्किंग

संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम आणि दादर, कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, इंडिया बुल फायनांन्स सेंटर पीपीएल पार्किंग एलफिन्स्टन ,कोहिनुर पीपीएल पार्किंग शिवाजी पार्क, ,आप्पासाहेब मराठे मार्ग, ,पाच गार्डन, माटुंगा, रेती बंदर, माहिम, आर ए के ४ रोड.(Senapati Bapat Marg, Mahim & Dadar, Kamgar Maidan, Senapati Bapat Marg, India Bull Finance Center PPL Parking Elphinstone, Kohinoor PPL Parking Shivaji Park, ,Appasaheb Marathe Marg, ,Pach Garden, Matunga, Reti Bandar, Mahim, RAK 4 Road .)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT