rajesh more criticize thackeray group over file nomination vaishali darekar ramesh jadhav Sakal
मुंबई

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांसह माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने शिवसेना शिंदे गटाकडून आता ठाकरे गटास लक्ष केले जात आहे.

पहिल्या उमेदवारावर नेत्यांचा विश्वास नाही असे म्हणत उमेदवार वैशाली दरेकर यांना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी डिवचले आहे. तर ठाकरे गटाचे नेते कधीच कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवत नाही असे म्हणत मोरे यांनी पक्षातील वरिष्ठांवर निशाणा साधला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ पहिल्या पासूनच चर्चेत राहीला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे व म्हाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात खरी लढत येथे होणार आहे. मात्र यात आता नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरकेर यांनी 30 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला होता. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शहरात रॅली काढण्यात आली होती. त्यातच शुक्रवारी केडीएमसी चे माजी महापौर रमेश जाधव यांनी देखील ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहॆ. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली आहॆ. तसेच उमेदवार वैशाली दरेकर यांना देखील लक्ष केले आहे.

डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोऱे यांनी सांगितले की,

ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांनी फॉर्म भरला आहे. याचा अर्थ असा होतो, ठाकरे गटाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांवर विश्वास राहिलेला नाही. उद्धव ठाकरे कधीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. पहिला उमेदवार दिला असताना दुसरा उमेदवार अर्ज भरतो.

म्हणजे पहिल्या उमेदवारावर यांचा विश्वास नाही. ठाकरे गटाचे नेते कधीच कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाहीत, ना कधी पाठीशी खंबीर उभे राहत. म्हणून त्यांचे कार्यकर्ते, नेते मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे नेते आहेत जे कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. खंबीरपणे उभे असतात व कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम करत असतात असे मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT