Atul Bhatkhalkar sakal media
मुंबई

विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर द्याच; भातखळकर यांचे टोपेंवर टीकास्त्र

टोपे यांच्या हकालपट्टीची मागणी

कृष्ण जोशी

मुंबई : आरोग्य विभागाच्या परिक्षेत (Heath department exam) सकाळच्या पेपरसाठी एक जिल्हा व दुपारच्या पेपरसाठी दुसरा जिल्हा असा पराक्रम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी (Health minister) आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था (helicopter facility) करावी किंवा मुख्यमंत्र्यांनी (chief minister) आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

सप्टेंबर महिन्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती महाभकास आघाडी सरकारने केली आहे. 24 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महापराक्रम’ केला आहे. या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आता हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करावी, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागणार असल्याचे दिसत असल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.

अनेक परीक्षार्थींनी अर्ज करताना जे केंद्र मागितले ते मिळालेच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही. त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पडला आहे. त्यामुळे आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे. खासगी यंत्रणेऐवजी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

Cancer Treatment: कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती

खरंच रानू मंडल वेडी झालीय? 5 वर्षात अशी झाली अवस्था, घरात कीडे तर खाण्याचे हाल तरीही, मध्येच हसते, मध्येच रडते

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही...; रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिलसह टीम इंडिया दौऱ्यासाठी रवाना Video Viral

SCROLL FOR NEXT