mumbai police 
मुंबई

मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या राज्याच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने सचिन वाझेना स्कॉर्पियो कारमधील स्फोटक प्रकरणात अटक केल्यामुळे पोलीस दल आणि राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. काही महत्त्वाच्या पदांवर फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन हटवण्यात येईल अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, असा कोणाताही प्रस्ताव आमच्याविचाराधीन नाही हे स्पष्ट केलं. 

आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सचिन वाझे प्रकरणाचा फटका बसेल, असं बोललं जात आहे. परमबीर सिंह यांना पदावरुन दूर केलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी वेगवेगळी नाव चर्चेत आहेत. यात रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर आहे. 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले रजनीश सेठ शांत स्वभावाचे आहेत. या पूर्वी रजनीश सेठ यांनी मुंबईच्या सहआयुक्त पदी अडीच वर्ष काम केंल आहे. त्यावेळी त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली होती. आझाद मैदान हिंसाचारावेळीही ते सहआयुक्त होते. या पूर्वी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. रजनीश सेठ हे फोर्स वनचेही प्रमुख होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्यामध्ये एका तास चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT