Raju patil tweet to CM uddhav Thackeray on water problem mumbai
Raju patil tweet to CM uddhav Thackeray on water problem mumbai sakal
मुंबई

बाहेर पडलेच आहेत तर आपल्या शहरातील "सासुरवास" बघा - राजू पाटील

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - बाहेर पडलाच आहात तर सभा वगैरे नको, #KDMC त फक्त पाहणी केली तरी खूप होईल. डोंबिवलीशी नातं आहे आपलं,आपल्याच शहरात चाललेला 'सासुरवास' बघा अशा खोचक शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाणी प्रश्नावरून ट्विट केले आहे. तसेच पालकमंत्र्यांना सिनेमा प्रमोशन व दौऱ्यातून वेळ मिळाला तर, त्यांनाही घेऊन या. पाण्यावाचून पाणावलेले डोळे पुसायलासुद्धा जरा वेळ द्या असा टोला त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

कल्याण ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याच पाणी टंचाईमुळे देसले पाड्यातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेने उपाय योजना केल्या असल्या तरी पाणी टंचाई अद्याप जाणवत आहे. दरम्यान पाणी टंचाई बाबत आपण बैठक घेऊ असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र याबतची बैठक अद्याप झाली नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा पाण्याच्या विषयावरती ट्विट केले आहे. या ट्विट मधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला हाणाला आहे.

याविषयी आमदार पाटील म्हणाले, काल मुख्यमंत्री साहेब बोलले की 6 महिन्यांनंतर बाहेर पडलो आणि सभा घेतली. आता बाहेर पडलेच आहेत तर एकदा आमच्या डोंबिवलीत या. डोंबिवलीच तुमचं नातं आहे, डोंबिवली सासूरवाडी आहे. एकदा येऊन येथील पाण्याची परिस्थिती बघा. नुसत्या निडणुका आल्या की आश्वासन देऊ नका इथे पाण्याची कमी नाही पण त्याचे नियोजन नाही आहे. हे नियोजन एका दिवसात होऊ शकते, फक्त अधिकाऱ्यांना आदेश द्यायची कमी आहे. परंतु त्या बाबतीत आम्ही पालकमंत्र्यांना हजार वेळा सांगून लक्ष देत नाहीत. पालकमंत्री भेटले तर त्यांनाही घेऊन या एकदा तुम्हाला परिस्थिती दाखवतो यात कुठलं ही राजकारण करायचं नाहीये. परंतु जे बळी चालेत मागच्या वेळेस पाच बळी एका घरातील गेले पालकमंत्री साधे तिकडे साधे बागायला सुद्धा आले नाही आहेत, पिक्चरच प्रमोशन करत फिरत होते. अश्या गोष्टींना जर तुम्ही संवेदनाहीन होऊन करत असाल तर कुठे तरी मुख्यमंत्र्याना काही संवेदना असेल तर त्यांनी या बाबीची दखल घ्यावी त्यासाठी हे ट्विट केलेल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT