Raju Shetti 
मुंबई

Raju Shetti: राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा मिळावा, म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत लढण्याचा प्रश्न नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

Sandip Kapde

Raju Shetti:  शेतकरी स्वाभीमानी संघटनेटे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांची अदानी उद्योग समुहाशी जी लढाली सुरु आहे. त्या अदानी समुहाचा शेतकऱ्यांना देखील त्रास होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

केंद्र सरकारेन अदानी समुहावरील प्रेमापोटी खाद्यतेलावरील आयात शुल्क ५ टक्के कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. २००० साली सोयाबीनचा असणारा भाव ४ हजार रुपये होता. २४ वर्षानंतर भाव आहे तेवढाच आहे. कारण मोठ्या प्रमाणात कच्च तेल बाहेरच्या देशातून आयात झालं, त्यामुळे सोयाबीनला भाव नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, १५ जानेवारीपासून सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाडा दौरा सुरु करणार आहे. अदानीविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी लढाई आहे ती आमची लढाई आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा मिळावा, म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत लढण्याचा प्रश्न नाही. आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT