Sunetra Pawar  esakal
मुंबई

Sunetra Pawar: पार्थ, छगन भुजबळ नाराज? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sunetra Pawar News: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.

Sandip Kapde

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईतील विधानभवनात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.

दरम्यान महाराष्ट्रात राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली होती. यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. पक्षाने विश्वास दाखवल्यामुळे मी दिलेल्या संधीचं सोन करण्याचा प्रयत्न करेल, असे त्या म्हणाल्या.

लोकसभेला उमेदवार होते कारण जनतेची मागणी होती. आता देखील जनेतेने मागणी केली होती. पार्थ पवार यांनी स्वत: सांगितलं की कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार मी उमेदवारी घ्यावी, त्यामुळे मी आज अर्ज भरल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT