ashish shelar
ashish shelar sakal
मुंबई

शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच! शेलारांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत आमचा तिसरा उमेदवार जिंकणारच, असा विश्वास व्यक्त करताना शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारचं असं विधान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Rajya Sabha Election Shiv Sena Sanjay will be defeated BJP MLA Ashish Shelar expressed confidence)

शेलार म्हणाले, "आज आमचे केंद्रीय निरिक्षक आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. यामध्ये केंद्रीय मंत्री आणि आमचे राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयलही उपस्थित होते. यावेळी झूम बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शक केलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या निवडणुकीचं पूर्वनियोजन आम्ही केलं असून आमचा तिसरा उमेदवार जिंकणारचं आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच हे स्पष्ट आहे"

पराभव दिसत असल्यानं त्यांची उत्तर तयार - शेलार

शिवसेनेला आपला पराभव दिसत असल्यानं त्याची कारणमिमांसा करण्याआधीच ते उत्तर पेरत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा याच्याशी काही संबंध नाही. ज्यांच्या पक्षीय यंत्रणा बिघडल्या आहेत. ज्यांचं पक्षीय स्वास्थ्य बिघडलं आहे ते फुकटचे वारे आपल्या तोंडातून घालवत आहेत, अशी सवय असलेल्यांमध्ये संजय राऊत पुढे आहेत, असंही यावेळी शेलार यांनी म्हटलं आहे.

सतेज पाटलांनी काँग्रेसचे आमदार सांभाळावेत

भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं होतं. यावर भाष्य करताना शेलार म्हणाले, कोल्हापूरचे काँग्रेसचे काही आमदार सतेज पाटलांनी सांभाळले तर बरं होईल. दुसऱ्यावर दोष देण्याऐवजी स्वतःच्या आमदारांनाच यांना नजरकैदेत ठेवावं लागतंय. आमदारांना कैदेत ठेवण्याचं पाप महाविकास आघाडी करत असून लोकशाहीवरही बोलत आहे. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याएवढा आमदारांचा अपमान कुठल्याच पक्षानं केलेला नाही. जे तबेल्यात राहतात त्यांना घोडेबाजार दिसतो. शिवनेसेच्या नेत्यांनी तबेल्यात झोपणं सोडून द्यावं त्यांना अशी स्वप्न पडणार नाहीत, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT