मुंबई

अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी यासाठी राम कदम यांची तळोजा तुरुंगाला भेट

गजानन चव्हाण

खारघर : अर्णब गोस्वामी यांची सुटका व्हावी यासाठी प्रत्येक घराघरांत पूजा केली जात आहे. जनतेचे प्रेम अर्णब यांच्या पाठीशी असल्यामुळे एक-दोन दिवसांत त्यांची सुटका होईल, असा आशावाद आमदार राम कदम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

तळोजा तुरुंगात असलेल्या अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेविषयी माहिती घेण्यासाठी आमदार राम कदम यांनी आज तुरुंग अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतली. बाहेर आल्यावर त्यांना पत्रकारांनी अर्णब गोस्वामींविषयी विचारणा केली असता मानवाधिकारानुसार गोस्वामी त्यांची देखभाल करावी याविषयी चर्चा केली. अर्णब गोस्वामींना अटक करून तुरुंगात डाबल्यामुळे महाराष्ट्रात रावणराज्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारविषयी जनतेच्या मनात संतापाचे वातावरण आहे. अर्णब यांच्या सुटकेसाठी देशातील प्रत्येक घराघरांत प्रार्थना केली जात आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अर्णब तुरुंगातून सुखरूप बाहेर येतील. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास असल्याचे कदम यांनी सांगितले. या वेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अर्णब गोस्वामी यांना उच्च न्यायालयाचा दणका! जामीन नाकारत सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मागील चार दिवसांंपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून आधी अलिबाग सत्र न्यायालयात  जामीन अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.

दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाला डावलून उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकणार नाही. त्यामुळे फौजदारी दंड संहिता439 नुसार कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज करावा, तसेच अलिबाग न्यायालयाने 4 दिवसांत निकाल द्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. गोस्वामी यांच्या सह अन्य दोन आरोपींनचा जामीन ही फेटाळला आहे. 

न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गोस्वामी यांनी हेबियस कौर्प्स याचिका आणि जामीन अर्ज केला आहे.  न्यायालयाने आज जामीनावर निकाल जाहीर केला.

अलिबाग पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीचे आत्महत्येचे प्रकरण न्यायालयाच्या परवानगी शिवाय तपासासाठी बेकायदेशीरपणे सुरू केले. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असून द्वेष पूर्ण हेतूने राज्य सरकारने केली आहे असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे. मात्र राज्य सरकार स्वतः च्या अधिकारात ए समरी अहवालाचे प्रकरण फेरतपासासाठी सुरू करु शकते असा युक्तिवाद सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अमित देसाई यांनी केला आहे. गोस्वामी यांच्या सह अन्य दोन आरोपींनीही जामीनासाठी याचिका केली आहे. 

Ram Kadam visits Taloja jail to demand release of Arnab Goswami

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT