मुंबई

Ram Mandir: धर्मवीर आनंद दिघे यांनी अशाप्रकारे केला होता ठाण्यामध्ये राम जन्मभूमी आंदोलनाचा प्रचार

The history of Ram temple, the entire history of how Babar demolished the temple

Chinmay Jagtap

Anand Dighe: 22 जानेवारीला अयोध्येच्या रामजन्मभूमीवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज जरी हे मंदिर बनत असलं तरी हे मंदिर बनण्यामागे मोठा इतिहास आहे.

यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आंदोलनावेळी घेतलेली भूमिका संपूर्ण भारतामध्ये सर्वश्रूत आहे. बाळासाहेबांचे कट्टर समर्थक तथा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी देखील राम जन्मभूमी आंदोलनावेळी रामजन्मभूमी विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली होती.

आनंद दिघे यांनी कशाप्रकारे त्या काळामध्ये राम जन्मभूमी मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिले होते. याची माहिती स्वतः शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली

आजच्या काळात आपण बघतो की कॅलेंडर छापले जातात. मात्र त्या काळात कॅलेंडर ही अभिनव कल्पना दिघे साहेबांनी आणली होती. आणि त्यामधूनच राम मंदिर मुक्तीचा संदेश त्यांनी दिला होता आणि त्याचा जागर केला होता. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्यांचा मला गर्व आहे असं बाळासाहेब म्हणाले होते आणि बाबरीचा ढाचा पडतानाचे फोटो असलेले कॅलेंडर दिघे साहेबांनी छापले होते

राम मंदिराचा इतिहास, बाबराने कशाप्रकारे ते मंदिर पाडलं याचा संपूर्ण इतिहास गणेशोत्सवामध्ये चलचित्र बनवून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम आनंद दिघे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.

साध्वी ऋतंभरा यांचं व्याख्यान ठाण्यातल्या शिवाजी मैदानामध्ये आनंद दिघे यांनी आयोजित केलं होतं यावेळी राम जन्मभूमी मुक्ती संग्रामाचे महत्त्व आणि त्याचा इतिहास, राम मंदिराचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपुढे नेण्यासाठी दिघे साहेबांनी हे पाऊल उचललं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT