मुंबई

Ram Mandir: वजीर सुळक्यावर भगवा रोवत कल्याणकरांचे श्री रामांच्या अयोध्येतील मंदिराचे स्वागत

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Ram Mandir: कल्याण येथील आणि संपूर्ण महााष्ट्रातील अग्रगण्य असलेली गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक ऍडवेंचर सुळक्यावर भगवा रोवत श्री राम मंदिराचे अनोख्या पदधतीने स्वागत करण्यात आले.वजीर सुळका म्हणजे 90 अंश कोणात उभा असलेला आणि सुमारे 300 फूट उंच असलेला एक सुळका.इतिहासात पहिल्यांदाच वजीर सुळक्याच्या माथ्यावरून श्री रामांचा भगवा ध्वज लागल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

वांद्रे गावातून गिर्यारोणाची सुरुवात करत सुमारे ३००० फूट उंच असलेला सुळक्याच्या पायथ्याशी श्री रामांची विधिवत पूजा करत ह्या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली.शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम कल्याण करांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका.

थोडी जरी तांत्रिक चूक झाली की जीवाला मुकावे लागणार असल्याने मृत्यूची भीती कायम,त्यात अश्या अती कठीण सुळक्यावर कल्याण करांनी भगवा ध्वज लावल्याने सर्वत्र सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाचे कौतुक करण्यात येत आहे.

सदर विशेष मोहिमेत संघाचे पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,भूषण पवार,सुहास जाधव,सुनील खनसे,अभिजीत कळंबे,स्वप्नील भोईर,प्रशील अंबाडे,राहुल घुगे यांनी सहभाग नोंदवून हा विक्रम करून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''तो' व्यवहार रद्द! माझ्या जवळचा कुणीही असला तरी..'' अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिली तंबी

Motivational Story: वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी, घरची परिस्थिती बेताची... कष्टातून लेक उभी राहिली अन् सीए परिक्षेत मोठी बाजी मारली

Latest Marathi News Live Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

कुणीही नसताना फ्लश झालं, खांद्यावर हात ठेवला... दिग्दर्शकाने सांगितला मुकेश मिलमध्ये 'उलाढाल'च्या शूटिंगचा अनुभव

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

SCROLL FOR NEXT