मुंबई

अरे वा! 'रामायण' आता मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार; वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रामानंद सागर निर्मित आणि दिग्दर्शित 'रामायण' या मालिकेने दूरदर्शनवर इतिहास रचला आहे. सगळ्या मालिकांना मागे टाकून ही मालिका नंबर वन मालिका ठरली आणि दूरदर्शनही नंबर वन वाहिनी ठरली. तब्बल तीस वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी ही मालिका बनविली. तेव्हादेखील या मालिकेला चांगली पसंती लाभली होती आणि आता कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळातही या मालिकेला तेवढीच पसंती लाभली.

लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या या मालिकेची लोकप्रियता दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये काही कमी झालेली नाही.अर्थात तीस वर्षांच्या कालावधीनंतरही या पौराणिक मालिकेची लोकप्रियता तेवढीच आहे हे दिसले. लॉकडाऊनमध्ये दूरदर्शन वहिनीवर ही मालिका दाखवल्यानंतर ही मालिका हिंदी खासगी वाहिनीवर देखील दाखवण्यात आली. त्यानंतर आता ही मालिका मराठीतही प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाह या वाहिनीने ही मालिका मराठीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

तीस वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेली ही मालिका आजदेखील प्रेक्षकांना तेवढाच आनंद देणारी आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांना मराठी भाषेत देखील पाहायला मिळणार आहे. १ जूनपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखविली जाणार आहे. याबद्दल स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.

रामानंद सागर यांची ही मालिका मुळात हिंदी भाषेत चित्रित करण्यात आली होती. त्यांनी या मालिकेचे मराठी भाषेत चित्रीकरण करून ठेवले होते. परंतू तेव्हा ती कोणत्याही मराठी वहिनीवर प्रसारित झाली नाही. आता बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच ही मालिका मराठीतून प्रक्षेपित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT