मुंबई

औरंगाबादचे नाव बदलण्यास रामदास आठवले यांचा तीव्र विरोध

तुषार सोनवणे

मुंबई  : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अट्टहास काही लोक करत आहेत; मात्र कोरोना पार्श्‍वभूमीवर असे वाद सरकारने बाजूला ठेवावेत. आता औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

सध्या औरंगाबादचे "संभाजीनगर' नामकरण करण्यावरून वाद पेटला आहे. कोरोनाच्या या काळात सामान्य जनता खडतर दिवसांना सामोरी जात असताना राज्याच्या विकासाचे विधायक मुद्दे बाजूला ठेऊन नामांतराचा मुद्दा राज्य सरकारने पुढे आणू नये. नामांतराच्या आंदोलनाची आम्ही धग भोगली आहे. त्यामुळे औरंगाबादचे आता नामांतर करू नये. औरंगाबादच्या नामांतरास रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील, असे रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत; मात्र त्यांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये, असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले. 

Ramdas Athavale strongly opposes changing the name of Aurangabad to sambhajinagar

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : बालशोषणाचा धक्कादायक प्रकार ! बेड बॉक्समध्ये लपवली मुलगी, वर झोपला घरमालक, पोलिसांनी 'अशी' केली सुटका, व्हिडिओ व्हायरल

जुन्या घराचा पाया खोदताना सापडला ब्रिटिशकालीन खजिना! ढिगाऱ्यातून बाहेर आला 'गुप्तधनाचा' ठेवा; चांदीच्या नाण्यांसह मौल्यवान वस्तू आढळल्या

Viral Video : खरी संपत्ती हृदयात असते ! चिमुकलीने भिकाऱ्याला दिले १० रुपये पण पुढे असं काही घडलं... व्हिडिओने जिंकली लाखोंची मने

Sarfaraz Khan ला उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, संघाला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

Best Recharge Plans : एअरटेल बघतच राहिले अन् मुकेश अंबानीच्या Jio ने मारली बाजी! 15 OTT सोबत Free मध्ये मिळतय Netflix, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT