मुंबई

कोरोनाची लागण झालेल्या गृहमंत्र्यांना रामदास आठवलेंकडून हटके शुभेच्छा

मिलिंद तांबे

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना कोरोनामधून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा काहींशा हटक्या आहेत. आपल्या कवितेद्वारे मिश्किल भाष्य करणारे आठवले यांनी गृहमंत्र्यांना कवितेद्वारे दिलेल्या शुभेच्छा आज चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी कोरोना बाधित झाले. रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत अनिल देशमुख यांच्यासाठी एक कविता सादर केली. 

रामदास आठवले यांची कविता 

"गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात,
गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ,
कोरोना ने माझा केला होता पिच्छा तेंव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा ! 
कारण तुम्ही आहात माझे चांगले मित्र, 
म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे  शब्दचित्र," 
केवळ मराठीत शुभेच्छा देऊन रामदास आठवले थांबले नाही, तर त्यांनी हिंदीतही कविता सादर केली.
अनिल देशमुखजी, 
आप कोरोना से मत डरोना, 
 मैने तो बोला है गो कोरोना,
कोरोना से मत हरोना।

रामदास आठवले यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हा अनिल देशमुख यांनी आठवले यांना कोरोनामुक्त होण्यासाठी याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या.

'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा, 
ग्रासले त्याच कविमित्र रामदास ll
धीर नका सोडू प्रसंग जरी  आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll

रामदास आठवले  यांच्या वाढदिवसाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले शैलीतूनच शुभेच्छा दिल्या होत्या. 

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!'

कोरोना काळात रामदास आठवले यांच्या कविता चांगल्याच चर्चेत राहिल्या. आपल्या पक्षातील, मित्र पक्षातील किंवा विरोधी पक्षातील कोरोना बाधित झालेल्यांना त्यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. आठवले यांनी देशमुख यांना शुभेच्छा दिल्या नंतर देशमुख यांना ही कवितेचा मोह आवरला नाही. कविता हा देशमुख यांचा प्रांत नसतानाही देशमुख यांनी आठवले यांना कवितेतच शुभेच्छा देत विचारपूस केली. यातून त्यांची अनेकदा जुगलबंदी ही रंगली. या जुगलबंदीमुळे कोरोना काळातही कवितांची खमंग चर्चा झाली तर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य ही फुलले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ramdas Athavale Wishes poem Home Minister Anil Deshmukh recovery Corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT