ramdas boat accident history esakal
मुंबई

Ramdas Boat Accident: 77 वर्षांपूर्वीची गटारी अमावस्या ! गेटवे ऑफ इंडिया अपघाताने जागवल्या रामदास बोटीच्या आठवणी

Gateway of India boat accident: गेट वे ऑफ इंडियाजवळ नीलकमल बोटीचा अपघात झाला असून ही प्रवाशी बोट पाण्यात उलटली आहे. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या बोटीत एकूण ८० प्रवाशी होते. यापैकी ६६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

गेट वे ऑफ इंडियाजवळ नीलकमल बोटीला अपघात झाला असून प्रवासी बोट पाण्यात उलटली आहे. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोटीत एकूण ८० प्रवासी होते, ज्यापैकी ६६ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

समाजात काही घटना अशा असतात की, त्‍याचे पडसाद वर्षानुवर्षे जनमानसांत कायम असतात. अशीच ७७ वर्षांपूर्वी घडलेली रामदास बोटीची दुर्घटना, आजही स्‍थानिकांच्या चांगली स्‍मरणात आहे.

१७ जुलै १९४७ मध्ये मुंबईहून रेवसला निघालेली रामदास बोट बुडून सुमारे ६२५ जणांचा मृत्‍यू झाला होता. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ लाटांच्या तडाख्यामुळे बुडाली होती. या दुर्घटनेने कोकणातील सागरी जलवाहतुकीचे स्वरूपच बदलून गेले.

लोककथा, लोकसंगीत, नृत्य, नाटकातून आजही रामदास बोटीच्या स्‍मृती जागवल्‍या जात आहेत. या बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक परळ, लालबाग या गिरणगाव परिसरातील, तसेच गिरगाव भागातील होते. मूळ कोकणवासी असल्याने रामदास बोट दुर्घटनेमुळे मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती.

दुर्घटनेतून वाचलेले अलिबागचे बरक्याशेठ मुकादम यांचे अलीकडेच निधन झाले. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आता कोणीही राहिलेला नाही; परंतु दुर्घटनेच्या स्‍मृती सर्वांच्या मनात आजही ताज्या आहेत. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोट दुर्घटनेनंतर प्रवासी जलवाहतुकीबाबत असलेल्या नियमांत आमूलाग्र सुधारणा करण्यात आली.

याच घटनेनंतर पावसाळ्यात जलवाहतुकीवर बंदी घालण्यात आली. त्याची अंमलबजावणी आजही सक्तीने केली जाते. अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे आता प्रवासी बोटींवर कार्यरत आहेत. याशिवाय सुरक्षा साधनांची बारकाईने तपासणी होत असल्‍याने त्‍यानंतर एकही मोठी दुर्घटना घडली नाही.

या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गाकडे विशेष लक्ष देण्यात आले. अवघड वळणे सौम्य करून बारमाही वाहतुकीसाठी सुलभ पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. तत्‍पूर्वी जलवाहतूक हेच कोकणातील लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन होते. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावरून कोकणात जाणाऱ्या बोटींना तुडुंब गर्दी असायची.

दुर्घटनेचा घटनाक्रम
१७ जुलै १९४७ रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी झाली होती. साडेसहाच्या सुमारास बोटीने नांगर उचलला आणि दीड तासाच्या प्रवासासाठी रेवसकडे मार्गस्थ झाली.

एव्हाना अमावस्येच्या उधाणाची भरती सुरू झाली होती आणि लाटांचे उंच तडाखे बोटीवर आदळू लागले होते. एका अजस्‍त्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या बाजूला कलंडली. तीन मजली बोटीच्या खालच्या डेकवरील प्रवासी वरच्या डेकवर गेले आणि ज्या बाजूने लाटांचे तडाखे आदळत होते, त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभे राहिले.

सगळा भार एका बाजूला आल्याने बोट एका बाजूला कलंडली. घाबरलेल्या कप्तानने बोट वळवली तेवढ्यात एका महाकाय लाटेच्या तडाख्यात सापडून बोट उलटी झाली. बोटीवर हाहाकार उडाला. जवळपास एक हजार प्रवासी बोटीवर होते, त्‍यापैकी केवळ २३२ जण वाचले होते.

नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंदीचा कायदा
रामदास बोट दुर्घटनेची कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. बी. एस. एन. कंपनी पुढे सिंदिया कंपनीत विलीन झाली. बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचे सिद्ध झाले. त्‍यानंतर मात्र प्रवासी बोटींवर दूरसंचार उपकरणे दिसू लागली.

नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंदीचा कायदाही सरकारने केला. या भीषण दुर्घटनेचे सागरी शास्त्रीय विश्लेषण सागरी जीवनाला वाहिलेले पहिले मराठी मासिक ‘दर्यावर्दी’ने आपल्या ऑगस्ट-सप्टेंबर १९४७ च्या दोन अंकातील लेखांमध्ये केले होते. येथील आगरी-कोळी लोककलांमध्ये रामदास बोटीचा उल्लेख हटकून होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT