मुंबई

नायजेरियन तरुणाच्या मृत्यूनंतर नालासोपा-यात धुमश्चक्री

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : जोशेफ या नायजेरियन युवकाचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्य झाला होता. या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या अज्ञात 3 ते 4 नायजेरियन तरुणांनी नालासोपाऱ्यात 27 वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटे साडे तीन च्या सुमारास घडली.

दरम्यान जोशेफच्या मृत्यू प्रकरणी प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद कऱण्यात आली असून गाड्यांच्या तोडफोड प्रकरणात अज्ञात नायजेरियन तरुणावर तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व प्रगती नगर गजानन हिंदी स्कुल समोर ही घटना घडली. या सर्वांत आमचा काय दोष, आमच्या गाड्या का फोडल्या असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. 

जोशेफ या नायजेरियन युवकाचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्य झाला होता. मृत्यूचे स्पष्ट कारण समोर आले नाही. मात्र ही बातमी तेथील स्थानिक नायजेरियन्सना कळताच त्यांनी नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरात उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्‍सी, टँकर, बाइक या वाहनांवर मोठं मोठे दगड टाकून वाहनांच्या काचा फोडल्या. विशेष म्हणजे हा सर्वप्रकार खुलेआम सुरू होता. दरम्यान स्थानिक नागरिकांनी नायजेरियन तरुणांना पकडण्याचा प्रयत्न ही केला मात्र ते पळून गेले.

नालासोपारात नायजेरियन्सची वस्ती 

नालासोपाराच्या प्रगती नगर परिसरात मागील काही वर्षात अनेक नायजेरियन राहायला आले असून त्यामुळे त्या परिसरात नायजेरियन लोकांची एक वस्ती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी अमली पदार्थाची मोठी तस्करी होते, रात्री अपरात्री नायजेरियन तरुण तरुणी खुले आम फिरत असतात, त्यांचा उपद्रवणे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यांच्यावर कारवाही व्हावी अशीही मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

"स्थानिकांकडून नायजेरियनांना त्रास' 

आमच्या जोसेफ या नायजेरियन तरुणाला येथील स्थानिक तरुणांनी मारहाण केली होती. त्याला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नाजेरियन भडकले होते; मा त्यांनी केलेली तोडफोड चूकीची असल्याचे नायजेरियन प्रतिनिधी दाऊद यांनी सांगितले, तर सर्वच नायजेरियन चुकीचे नाहीत, पण त्यांना स्थानिकांकडून मोठा त्रास सहन करावा लागत आहे, आजही अनेक नायजेरियन दहशतीखाली आहेत, असे नायजेरियन समर्थक लिओ गुप्ता यांनी सांगितले. 

नायजेरियन मृत्यू प्रकरणात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, तर वाहनांची तोडफोड करणाऱ्या अनोळखी नायजेरियन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सुरू आहे. 
- एस. डी. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुलिंज पोलीस ठाणे  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT