BMC
BMC sakal media
मुंबई

मुंबईच्या राणी बागेचं 200 कोटींचं कंत्राट BMC कडून रद्द

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राणीच्या बागेतील पिंजऱ्याच्या 200 रुपयांच्या कंत्राटचा विषय चांगलाच गाजला आहे. दरम्यान, राणीच्या बागेतील पिंजऱ्याचं 200 कोटींचं कंत्राट मुबंई महापालिकेनं उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राट खरेदीमध्ये हेराफेरी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होतो. आता मुंबई पालिकेनं हे कंत्राटच रद्द केल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान, यासंदर्भात मुंबईतील काँग्रेसचे पालकमंत्री अस्लम शेख त्यांच्याकडूनही आर्थिक हेराफेरीचा संशय व्यक्त करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये राणीच्या बागेतला पिंजरा खरेदी करण्यासंदर्भात हेराफेरी असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता यापार्श्वभूमीवर महापालिकेकडून हे कंत्राट रद्द करण्यात आलं आहे.

यासंदर्भात टेंडर्स फ्लोट करण्यात आले आहेत. एका विशिष्ट कंपनीला फायदा करण्यासंदर्भात हे टेंडर डिझाइन करण्यात आले होते. मुख्यतः राणीच्या बागेत जे दुर्मिळ प्राणी आहेत. त्यासंदर्भातही केस बनवण्याचा हा टेंडर होता. शंभर कोटीच्या आत या टेंडरची किंमत ठेवण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केला होता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता हे टेंडर महापालिकेकडून रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीहीब भाजपाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT