woman cheating esakal
मुंबई

Mumbai Crime : धक्कादायक ! पोलंडच्या महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी करायचा ब्लॅकमेल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आंबोली परिसरात परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. एका पोलंडच्या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली.

तक्रारीनुसार, आरोपी मनीष गांधीने नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत महिलेवर अनेकदा अत्याचार केले. पीडित तरुणी अंधेरीतील एका कंपनीत काम करत असताना आरोपींने वारंवार तिच्या नावाने अश्लील स्टोरी तयार करून ती व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली.

इतकंच नाही तर आरोपी मनीष गांधी पीडितेचे न्यूड फोटो, व्हिडिओ, इतर अश्लील व्हिडिओ तिलाच पाठवले. कामानिमित्त जेव्हा जेव्हा तो तिच्यासोबत जर्मनी, गोरेगाव, दिल्ली आणि इतर ठिकाणी जात असे, तेव्हा फोटो काढून तिला शारीरिक आणि मानसिक त्रासही देत असे.

आरोपी पीडितेला अनेक दिवसांपासून धमकी देत होता की तो तिचे व्हिडिओ आणि फोटो तिच्या नातेवाईकांना आणि कंपनीतील इतर लोकांना पाठवेल. आंबोली पोलिसांनी आरोपी मनीष गांधी याच्याविरोधात कलम ३५४ अ, ३५४ सी, ५०९, ५०६, ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT