rape case  File photo
मुंबई

प्रियकराकडूनच घात, बँड स्टँड येथे तरुणीवर बलात्कार

दोन मोटरसायकलवरून वांद्रे परिसरात आले होते.

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: बांद्रा बँड स्टँड (band stand) येथे 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (rape case) केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यातील दोन आरोपींनी तरूणीवर बलात्कार केला. तर एका आरोपींनी त्यांना गुन्ह्यांत मदत केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने तिघांनाही याप्रकरणी 19 मेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. (rape on girl at band stand in bandra area)

तक्रारदार व आरोपी मानखुर्द येथील रहिवासी आहेत. 11 मेला तक्रारदार व तीन आरोपी दोन मोटरसायकलवरून वांद्रे परिसरात आले होते. त्यातील एक आरोपी तक्रारदार तरुणीचा प्रियकर आहे. त्यातील दोघांनी तेथील खडकांमध्ये नेऊन तरूणीवर बलात्कार केला. यावेळी तिसरा आरोपी आजूबाजूला लक्ष ठेऊन होता. त्यानंतर चौघेही आपल्या घरी गेले.

या तरूणीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तिच्या बहिणीने विचारले असता तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर 12 मे ला तरुणीची बहिण तरुणीला वांद्रे पोलिस ठाण्यात घेऊन गेली तेथे मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 376 व 376(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर 13 मेला तिनही आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने 19 मेपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी 20 ते 23 वर्ष वयोगटातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire News: भीषण आग! सुक्या अन्न गोदामात अग्नितांडव; ७ जणांचा मृत्यू, २० कामगार बेपत्ता, घटनेनं खळबळ

एक- दोन नाही तर तब्बल 200 वर्षांनी बनतोय त्रिग्रही राजयोग ! येत्या 6 दिवसांत तीन राशींना येणार सोन्याचे दिवस

Latest Marathi news Update : बीआरएसचे माजी खासदार संतोष बाबू यांना हैदराबादमधील जुबली हिल्स पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

Padma Awards 2026: शिक्षण क्षेत्रात कोणाला मिळाले पद्म पुरस्कार? जाणून घ्या संपूर्ण यादी एका क्लिकवर

Share Market : बजेटआधी शेअर बाजार तापला! या आठवड्यात 5 नवे आयपीओ उघडणार; 'या' मोठ्या कंपनीची लिस्टिंग होणार

SCROLL FOR NEXT