rashmi shukla sakal media
मुंबई

रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार का? हायकोर्टाचा सवाल

सुनिता महामुनकर

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांना मुंबई पोलीस आरोपी करणार आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) आज केला. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे (hidden documents) लिक करणे यासंबंधी मार्चमध्ये फौजदारी गुन्हा दाखल (Police FIR) केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका (petition) केली आहे.

यावर आज न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल ता. 25 रोजी दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. पोलिसांनी अद्याप शुक्ला यांना आरोपी केलेले नाही, मात्र सध्या तपास सुरू आहे असे प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटले आहे. विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी याची माहिती खंडपीठाला दिली. जर शुक्ला यांना आरोपी केले नसेल आणि त्यांना पोलीस आरोपी करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी घेऊन वेळ घालवणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. जेव्हा त्यांना आरोपी केले जाईल तेव्हा त्या पुन्हा न्यायालयात याचिका करु शकतात असेही न्यायालयाने सांगितले. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 25 रोजी होणार आहे.

शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे महत्त्वाचे फोन टॅप केले आणि यासंबंधी तयार केलेला गोपनीय अहवाल गैरप्रकारे उघड केला असा आरोप पोलिसांनी केला आहे. मात्र वरिष्ठांना विचारुन फोन टैप केले होते असा दावा शुक्ला यांनी केला आहे. हा तपास सीबीआयकडे सुपूर्द करावा आणि कठोर कारवाईपासून संरक्षण द्यावे अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT