sachin ahir sakal media
मुंबई

रामिम संघाला वेगळ्या उंचीवर नेणार; सचिन अहिर यांची घोषणा

कृष्ण जोशी

मुंबई : कामगारांच्या (workers) विश्वासाला तडा जाऊ न देता, भविष्यातील सामाजिक, कामगार आणि शैक्षणिक क्षेत्राचे (Education Field) लक्ष डोळ्यासमोर ठेवून संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेले जाईल, असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर (sachin Ahir) यांनी येथे व्यक्त केला.

मुंबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दसऱ्याच्या दिवशी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात संघटनेची नवी दिशा आणि नवा संकल्प अहिर यांनी जाहीर केला. यावेळी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे, उत्तम गीते, जी. बी. गावडे, सुरेश मोरे, काशिनाथ माटल आदी उपस्थित होते.

कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रथम असंघटित कामगारांना संघटित करण्यासाठी व नंतर कामगार हितकारक कायद्यांसाठी सतत लढावे लागले. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरक ठरावा यासाठी अमृतमहोत्सवी वर्षात डॉक्युमेंटरी-माहिती चित्रफीत प्रदर्शित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचप्रमाणे अमृतमहोत्सवी वर्षात संघटनेचा 75 वर्षांचा समग्र इतिहास पुस्तकरुपाने समोर आणणार आहोत. हे पुस्तक कामगार चळवळीचा नव्याने अभ्यास करणाऱ्याला मार्गदर्शक ठरेल, असेही अहिर यांनी म्हटले.

संघटनेने हॉटेल मँनेजमेंट वरील कॉलेज सुरू करुन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शैक्षणिक कामाची झेप दाखवून दिली आहे. याद्वारे कामगाराचा मुलगा हॉटेलचा व्यवस्थापक किंवा मालक होऊ शकेल, असेही अहिर म्हणाले. तर आंबेकर यांच्यानंतर बाळासाहेब सावंत, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर रजनी पटेल यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी संघटनेला बळ दिले. अहिर यांनी तर चौफेर कामातून तिच्यावर सुवर्ण कळस चढविला आहे, असे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले. खजिनदार निवृत्ती देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT