मुंबई

Ravindra Chavan: डावखरेंना निवडून आणण्यासाठी काय आहे महायुतीचा प्लॅन? वाचा काय म्हणाले रवींद्र चव्हाण

Konkan Graduate Constituency Election: कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात बिर्ला कॉलेज येथे 15 बूथ असून एकूण 9 हजार सातशे 44 मतदार आहेत.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivli: कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली. यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे , महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे रमेश किर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

डोंबिवली मधील साऊथ इंडियन शाळेत कोकण पदवीधर मतदानास सकाळी सुरवात झाली. सकाळ पासून मतदारांनी मतदान केंद्रावर जमण्यास सुरवात केली.

राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे देखील सपत्नी डोंबिवलीतील मतदान केंद्रावर दाखल झाले.

मंत्री चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला . यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात यंदा देखील महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास बोलून दाखवला.

या निवडणूकीसाठी कल्याण डोंबिवलीमधील चार विधानसभा मतदारसंघात एकूण 27 बुथ असून 18 हजार 783 मतदार आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात बिर्ला कॉलेज येथे 15 बूथ असून एकूण 9 हजार सातशे 44 मतदार आहेत.

कल्याण  ग्रामीण मतदार संघामध्ये सिस्टर निवेदिता शाळेत 5 बूथ असून एकूण 3611 मतदार आहेत. तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात नूतन विद्यामंदिर येथे 4 बूथ असून 2 हजार 965 मतदार आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये साऊथ इंडियन शाळेत 3 बूथ असून एकूण 2 हजार 463 मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT