Ravindra Waikar|North West Mumbai Constituency Esakal
मुंबई

Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

North West Mumbai Constituency: शिंदे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.

आशुतोष मसगौंडे

शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना अखेर उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची पसंत केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वायकर यांना आता थेट लोकसभेची लॉटरी लागली आहे.

आता उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून रवींद्र वायकरत तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून अमोल किर्तीकर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

(MLA Ravindra Waikar has been nominated by Shiv Sena from North West Mumbai)

ठाकरेंना साथ अन् ईडी कारवाई

जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास 40 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते. मात्र, ठाकरेंसोबत राहिलेल्यांमध्ये रविंद्र वायकरांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आमदार रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई केली होती. जोगेश्वरीतील बीएमसीच्या जमिनीवर एका आलिशान हॉटेलच्या कथित बांधकामाप्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

जानेवारी-जुलै 2021 मध्ये बीएमसीची दिशाभूल करून हॉटेल बांधण्यासाठी बेकायदेशीरपणे मंजुरी घेतल्याचा आरोप आमदार वायकर आणि इतरांवर असल्याची माहिती आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेली ही जमीन क्रीडा आणि मनोरंजनासाठी राखीव होती, ती वायकर आणि इतरांना सार्वजनिक वापरासाठी देण्यात आली होती. मात्र, या सर्वांनी या जमिनीचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला, असा आरोप आहे.

वायकरांची राजकीय कारकिर्द

65 वर्षीय रवींद्र वायकर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत सक्रीय आहेत. ते चार वेळा बीएमसीचे नगरसेवक आणि चार वेळा बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारमध्येही त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले होते. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथून तीन वेळा आमदार राहिले आहेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

त्याच्यावरून संस्कार नाही ठरत... रेणुका शहाणेंनी मांडलं मत; म्हणतात- काही जणी पदर घेतात पण इतक्या घाणेरड्या...

DMart Discount Offers : डीमार्टमध्ये सामान एवढं स्वस्त देणं मालकाला परवडतं कसं? डिस्काउंट ऑफरमागं आहे सिक्रेट..समोर आलं शॉकिंग कारण

Latest Marathi News Live Update : रबी हंगामातही पीएम किसान विमा योजना

Akshay Nagalkar Murder Case : बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणातील ९ आरोपी अटकेत; मृतकाचे हाडांचे तुकडे, दोन देशी पिस्तुल अन् वाहनेही जप्त

SCROLL FOR NEXT