मुंबई

PMC बॅंक प्रकरणावर RBI चं मोठं वक्तव्य 

सकाळ वृत्तसेवा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (पीएमसी बॅंक) प्रकरणावर आमचे बारकाईने लक्ष असून "फोरेन्सिक ऑडिट'सुद्धा केले जात असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. पीएमसी बॅंक ही देशातील आघाडीच्या दहा नागरी सहकारी बॅंकांपैकी एक आहे. या बॅंकेवर गेल्या 23 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बॅंकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 

पीएमसी बॅंकेच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहोत. शिवाय पीएमसी बॅंक प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे, असे दास यांनी आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. 

पीएमसीने मोठ्या रकमेच्या विविध थकित कर्जांची माहिती बॅंकेने न दिल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बॅंकेने या दरम्यान खातेधारकांना पैसे काढण्यावर मर्यादा घातल्या आहेत. पीएमसी बॅंकेने "एचडीआयएल'ला दिलेल्या कर्जातील 4,335 कोटी रुपयांना दुसरीकडेच वळते केल्याचा आरोप आहे. मंगळवारी रिझर्व्ह बॅंकेने खातेधारकांनी काढवयाच्या पैशाची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यत वाढवली आहे. 

"एचडीआयएल'चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांच्यासहीत पाच जणांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांनी मुंबईत अनेक ठिकाणी आतापर्यंत निदर्शने केली आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या मुख्यालयासमोरही निदर्शने करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून आतापर्यंत दहा खातेधारकांचा मृत्यू झाला आहे.

WebTitle :  RBI on PMC bank issue

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT