मुंबई

दहावी-बारावी अनुत्तीर्णांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा; विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी हेल्पलाईन

तेजस वाघमारे

मुंबई : राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. या फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून 19 नोव्हेंबरपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होणार आहे. 

परीक्षेच्या भीतीने विद्यार्थी मानसिक तणाव व दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी तसेच विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सहज मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य मंडळाच्या कार्यालयात 19 नोव्हेंबरपासून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक 27881075/27893756 असे आहेत. ही हेल्पलाईन सेवा 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. फेरपरीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन व मदत घेता येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, वेळापत्रक, हॉलतिकीट तसेच प्रश्‍नपत्रिकेशी संबंधित प्रश्‍न आदीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये; मात्र यासंबंधात काही शंका असल्यास मुंबई विभागीय मंडळ कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर विचारणा करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांनी परिपत्रकाद्वारे दिली. 

समुपदेशकांचे नाव व भ्रमणध्वनी 
अशोक सरोदे- 9322527076, एस. एन. शिपूरकर- 9819016270, व्ही. एन. जाधव- 9868874623, बी. के. हयाळीज- 9423947266, श्रीकांत शिनगारे- 9869634765, स्नेहा चव्हाण- 7506302353, अखलाक शेख- 9967329370, अनिलकुमार गाढे- 9969038020, चंद्रकांत मुंढ- 8169699204, शैलजा मुळये- 9820646115 यांच्याशी संपर्क साधावा. 

Re examination in November December for 10th 12th failures Helpline for solving students problems

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT