मुंबई

"सोमय्या शिखंडीची भूमिका बजावतायत, 'फ्रॉड' शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या" - पेडणेकर

सुमित बागुल

मुंबई : आज पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आज शिवसेनेवर निशाणा साधताना सोमय्या यांनी शिवसेना नेते रवींद्र वायकर, शिवसेनेचे मंत्री आणि अनिल परब आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केलंय. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टी वासियांसाठीचे गाळे लाटलेत. सोबतच अजमेरा सोबत झालेल्या जमीन व्यवहारावर देखील किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतलाय. 

किरीट सोमय्या यांनी  अजमेरा बिल्डर सोबत झालेल्या व्यवहाराची माहिती राज्यपालांना दिली आहे अंडी याबाबत राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याचे सोमय्या म्हणालेत. दरम्यान किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार, मुंबई महापालिका SRA आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

यावर किशोरी पेडणेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाभारतात कौरव शिखंडीच्या मागून लढाई करत होते, तसं किरीट सोमया शिखंडीची भूमिका बजावतायत आणि आरोपांवर आरोप करतायत. फ्रॉड या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. वारंवार तक्रारी करायच्या, लोकांना डिस्टरब करायचं, आवाज करायचा एवढंच त्यांचं काम आहे. किरीट सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करतात, त्यांनी आरोप सिद्ध करावेत. ते आरोप करत राहतील आणि आम्ही त्यांच्या मागे मागे आरोपांवर उत्तर देत बसणार नाही. आम्ही, उध्दवसाहेब चांगलं काम करतायत, ते फक्त डिस्टरब करण्याचं काम करतायत, आम्ही त्यांना घाबरत नाही, असं मुंबई महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. 

reaction of BMC mayor kishori pednekar after serious allegations by kirit somayya 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT