मुंबई

Ayodhya Verdict : आलेला निकाल आस्था मजबूत करणारा - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, असदुद्दिन ओवैसी, बाबा रामदेव याचसोबत अनेकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्यात. अशातच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अयोध्या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत. 

आपली प्रतिक्रिया देताना, राम जन्मभूमी संदर्भातील सर्वोच्च मूल्यांना अधिक मजबूत करणारा असा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय असं फडणवीस म्हणालेत. यामध्ये कुणाचाही विजय किंवा पराजय नाही. भारतीय अस्त्मितेचं प्रतिक आणि आस्था मजबूत करणारा असा हा निर्णय असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलंय.

अतिशय चांगलं वातावरण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्राने  सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारल्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. येत्या काळात इतर धार्मियांचे सण येतायत. अशात सर्वांनी शांतता राखत सर्वधर्मीय सण साजरे करावे असं आवाहन त्यांनी केलंय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी जी भारत भक्तीची भावना व्यक्त केली, तोच भाव भारतात निर्माण झालाय असं मला वाटतंय. सबका साथ सबका विकास यासाठी एकत्रित येत याचा सर्वजण एकजुटीने याचा सन्मान करतील. या निर्णयाचं स्वागत करतो असं शेवटी फडणवीस म्हणालेत.  

अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल; वादग्रस्त जमिनीवर मंदिरच!

अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनसंदर्भात आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, याठिकाणची वादग्रस्त जमीन तीन पक्षकारांना समान हिश्श्यांमध्ये विभागून देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत या जागेचे त्रिभाजन करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. येथील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 1950 पासून न्यायालयात असलेल्या या प्रकरणाच्या निकालाबाबात देशभरात उत्सुकता आहे. 

WebTitle : reaction of devendra fadanavis on ayodhya verdict 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT