Chhagan Bhujbal, Mumbai Police And Baba Siddique Murder Esakal
मुंबई

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

Chhagan Bhujbal On Baba Siddique Murder: निर्मल नगरमधील कोलगेट मैदानाजवळील बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आशुतोष मसगौंडे

Reason Behind Burder of Baba Siddique:

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी त्यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निर्मल नगरमधील कोलगेट मैदानाजवळील बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिद्दीकी यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्याच्या निधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते.

हत्येमागे काय कारण?

दरम्यान माजी मंत्री बाब सिद्दीकी यांच्या हत्येमागे काय कारण असेल याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, " सिद्दिकी यांच्या हत्येमागे राजकारण आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार मला दिसून येत आहे. पोलिसांना सर्व काही कळतंय पोलिसांनी त्याचा बीमोड केला पाहिजे."

यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना भुजबळांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखणे फक्त फक्त गृहमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. यासाठी पोलीस खात्यात योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजेत. योग्य अधिकारी कोण आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असतं."

फक्त गृहमंत्री नाही, मुख्यमंत्र्यांचीही जबाबदारी

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले, "मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे की, आपलं नाव खराब होत आहे ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोरपणे या सर्वांचा बंदोबस्त झाला पाहिजे. असे करताना गृहमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे असं सांगितलं पाहिजे. जे कोणी गुंड आहेत त्यांची विल्हेवाट लावा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT