मुंबई

बायकोची तंबाखूची सवय नवऱ्याला पटत नसेल तर घटस्फोट मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिला निकाल

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 18 : बायकोला तंबाखू खाण्याची सवय असली आणि नवऱ्याला तिची सवय आवडत नसली तरी हे काही घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ या कारणासाठी नवरा घटस्फोट मागत असेल तर तो मंजूर होऊ शकत नाही. जर घटस्फोट मंजूर झाला तर मुलांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. 

मुंबई उंउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये नवऱ्याने 2015 मध्ये घटस्फोट मिळण्यासाठी याचिका केली होती. नागपूर कुंटुब न्यायालयाने त्याचा दावा नामंजूर केला होता. पत्नीला तंबाखू खाण्याची सवय आहे. यासाठी तिला अनेकदा मनाई केली मात्र ती ऐकत नाही, त्यातून तीला घशाला विकार झाला. त्यावर माझे भरमसाठ पैसे तिच्या उपचारासाठी खर्च झाले, अशी तक्रार पतीने केली होती. तसेच सन 2012 मध्ये ती घर सोडून गेली होती, असे देखील नवऱ्याचे म्हणणे होते. 

मात्र पत्नीच्या वतीने सर्व दाव्यांचे खंडन करण्यात आले. नवरा आणि सासू नेहमीच मानसिक आणि शारीरिक छळ करतात आणि माहेराहून स्कूटर घेऊन ये, अशी मागणी करतात. नवरा जेव्हा एचआयव्ही बाधित झाला होता तेव्हादेखील दोन वर्ष त्याच्या बरोबर होते. मात्र छळ असह्य झाला म्हणून माहेरी गेले होते, असे पत्नीकडून सांगण्यात आले.

न्या. पुष्पा गनेडिवाला आणि न्या. ए एस चांदुरकर यांच्या खंडपीठाने याचिकेवर नुकताच निकाल जाहीर केला. कुटुंब न्यायालयाने दिलेला निकाल योग्य आहे असे खंडपीठाने म्हटले आहे. पत्नीची तंबाखू खाण्याची सवय घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही. भांडणे होतात, कामे करत नाही अशा अन्य लहान मोठ्या तक्रारी नियमित जीवनातील असतात. त्यामुळे त्यातून पतीचा छळ झाल्याचे सिध्द होत नाही. तसेच पत्नीच्या आजार सिद्ध करण्यासाठी पतीने वैद्यकीय अहवाल आणि बिले सादर केली नाही. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि पतीची याचिका नामंजूर केली.

reason of wife eating tobacco is not enough to get divorce says nagpur bench of mumbai high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT