corona death 
मुंबई

मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमागील नेमके कारण काय?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे भारतात सर्वाधिक रुग्णांची आणि मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबईलाच सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमागील अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी अनेक जणांचे मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यावर अवघ्या काही तासांतच झाल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना मृतांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून कृती दलाची स्थापना झाली आहे. यासंदर्भातही समिती लवकरच अहवाल देईल, मात्र या रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायला उशीर का झाला? त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास तसेच त्यांच्या चाचणीस विलंब झाला का याकडे लक्ष देण्यात येणार आहे. 

मुंबईतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, 14 जणांचा मृत्यू रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात झाला; तर 25 जणांचा मृत्यू एका दिवसात झाला, तसेच अकरा जणांना कोरोना झाल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालातून समोर आले. त्याशिवाय 14 जणांना कोरोना झाला असल्याचे त्यांच्या निधनापूर्वी काही तासांपूर्वी कळले होते. 

कोरोना झालेल्या काही रुग्णांना खाजगी तसेच सार्वजनिक रुग्णालयात दाखल होण्यासाठी उंबरठे झिजवावे लागल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्याचबरोबर सर्दी - खोकला झालेल्या अनेकांची कोरोनाची चाचणी झालीच नाही. काही रुग्णांनी तर आपली लक्षणे लपवून ठेवली. प्रकृती खूपच बिघडल्यावर ते रुग्णालयात आले असावेत, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र त्याचवेळी काही अभ्यासक कोरोना झालेल्या रुग्णांना अनेक रुग्णालयात फिरावे लागले होते, याकडे लक्ष वेधले. नायर रुग्णालयात कोरोनामुळे निधन झालेली गरोदर महिला त्यापूर्वी चार रुग्णालयात गेली होती, तर केईएम रुग्णालयात निधन झालेले 67 वर्षीय पाच रुग्णालयात फिरून आले होते. 

कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र लागण झाल्यावर काही दिवसात थकवा जाणवू लागतो. त्यानंतर प्रकृती वेगाने खालावते. चाचणीचे प्रमाण वाढवल्यास मृतांची संख्या कमी होऊ शकेल, असेही काहींचे मत आहे. मात्र सर्दी खोकला झालेल्या रुग्णांना दाखल करुन घेण्यास अनेक खासगी रुग्णालये तयार नसतात. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची साथ आपल्या रुग्णालयात पसरेल, अशी डॉक्टरकांना धास्ती वाटत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT