मुंबई

नोव्हेंबरमधील कमाल तापमानाचा विक्रम 

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोकण पट्ट्यात तापमानाची वाढ कायम असून शनिवारी मुंबईच्या कमाल पाऱ्याने नोव्हेंबर महिन्यातील 15 वर्षांच्या कमाल तापमानाचा विक्रम मोडला. शनिवारी मुंबईचा कमाल पारा 37.6 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. मुंबईचे कमाल तापमान राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले. 

नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही वाढत्या तापमानातून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. उलट कमाल पारा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून 36 अंश सेल्सिअसवर दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशीच्या कमाल तापमानाची 36.7 अंशांवर नोंद झाली. शनिवारी कमाल तापमान 37.6 अंशांवर स्थिरावले; मात्र या तापमानाने नोव्हेंबर महिन्यातील 15 वर्षांचा विक्रम मोडला. 4 नोव्हेंबर 2003 मध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 10 वर्षांपूर्वी 2008 मध्ये 36.5 अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा विक्रम होता. शुक्रवारपासून किमान तापमानात तीन अंशांनी झालेली वाढ शनिवारीही कायम राहिली. किमान पारा 24 अंश सेल्सिअसवर दिसून आला. 

तापमानाचा अंदाज 
रविवार आणि सोमवारी तापमान कमाल 37 आणि किमान 24 अंश सेल्सिअसवर राहण्याचा अंदाज. रविवारी सायंकाळी आकाश ढगाळ राहील. सोमवारी दिवसभर आकाश ढगाळ राहील. 

किनाऱ्यावर खारे वारे कमाल तापमान नियंत्रित ठेवतात. हे वारे उशिरा दाखल झाल्यास कमाल तापमानात वाढ होते. सध्या कमाल तापमानवाढीचा हा प्रकार दिसून येत आहे. 
- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT